पुर्णा, दि.13(प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड या दरम्यान विशेष गाडीच्या चार फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे... हुजूर साहिब नांदेड – सीएसएमटी विशेष (07603): दिनांक 22 व 29 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी रात्री 11.45 वाजता नांदेड येथून सुटेल. ही गाडी पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे मार्गे जाऊन मंगळवारी दुपारी 1.40 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी – हुजूर साहिब नांदेड विशेष (07604):
दिनांक 23 व 30 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी दुपारी 4.35 वाजता सीएसएमटी वरून सुटेल. ही गाडी बुधवारी सकाळी 6.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या विशेष गाडीत जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित वर्ग असे एकूण 22 डब्बे असतील