नांदेड रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे

Spread the love

नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)

दमरेच्या नांदेड रेल्वे विभागात अंतर राष्ट्रीय योग दिवसानिमित्त रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डिअरएम कामले यांच्या सह विभागातील बड्या बाबुंसह नांदेड विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक योग दिवसानिमित्त नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने विभागीय कार्यालयसह विविध रेल्वे स्थानकांवरील कार्यालये आणि नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे इंस्टिट्यूट येथे ता.२१ जुन रोजी योग दिनाचे आयोजन केले होते.यावेळी. प्रदीप कामले(विभागीय रेल्वे व्यवस्थापक) आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. शिवा बिरकले, (आर्ट ऑफ लिविंग समन्वयक), श्रीमती प्रगती सिंग, प्रियंका गंगाधीरे, नागेश अनिलकंठवार (योग शिक्षक आर्ट ऑफ लिविंग )यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगा चे महत्व सांगितले. योग केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभते हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षण दिले.

प्रदीप कामले यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योग अभ्यासाचे महत्व उपस्थितांना सांगितली. कामले म्हणाले की, योग साधना सुरु करायला वयाची अट नसते तसेच इच्छुकांनी विशेष दिवसाची प्रतीक्षा न करता लगेच योग साधना सुरु करायला हवी आणि योग साधनेचा लाभ घ्यायला हवा.

You cannot copy content of this page