कौतुकास्पद;लोहमार्ग पोलीसांनी वाचवले रेल्वेखाली जिव देण्या-या तरुणांचे प्राण

Spread the love

नांदेड रेल्वे स्थानकावरील प्रकार;सपोनि हनुमंत पांचाळ व सहका-यांची कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)
नांदेड रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलीसांनी धावत्या रेल्वे समोर जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर झोपलेल्या एका २७ वर्षीय तरुणास प्रसंगावधान राखून ताब्यात घेत त्याचा जीव वाचवला आहे.ही कौतुकास्पद कामगिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी ता.६ रोजी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत पांचाळ,पोहेकाॅ.राठोड,पोकाॅ.निखील गजभिये हे नांदेड रेल्वे स्थानकावर काचिगुडा येथून नगरसोल जाणारी गाडी १ नंबर प्लॅटफॉर्मवर येणार असल्याने पायी गस्त घालत होते.सदरील रेल्वे स्थानकावर येत असल्याचे पाहून एक २७ वर्षीय तरुण जीव देण्यासाठी चक्क रेल्वे रुळावर झोपला.यावेळी गस्तीवर असलेल्या सपोनि पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास रेल्वे रुळावरून ताब्यात घेत त्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले त्याची विचारपूस केली असता तो बिहार राज्यातील मोहनिया जिल्ह्यातील गावकली येथील रहिवासी असुन त्याचे नांव आसिफ जाकीर अन्सारी असल्याचे त्याने सांगितले.पोलीसांनी त्याचे योग्य समज देऊन त्यास आत्महत्या न करण्यापासुन परावृत्त केले.विश्वासात घेऊन त्याचे नातेवाईकांना संपर्क साधून त्यांना नांदेड येथे बोलावून घेत त्याला त्यांचे ताब्यात दिले.नातेवाईकांनी लोहमार्ग पोलीस ठाणे नांदेड येथील पोलिसांचे आभार मानले. या प्रकाराबद्दल जनतेतून लोहमार्ग पोलीसांचे कौतुक केले जात आहे.


 अर्थिक विवंचनेत सापडलेल्या, पारिवारिक कलहात तसेच प्रेमभंगामुळे रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली आहे.त्यात नवतरुणानचे प्रमाण अधिक आहे.अश्या प्रकारे जर कोणी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करण्याच्या विचारात असेल तर त्यास योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे मन वळवता येते.पोलीसांच्या अशी गोष्ट लक्षात आल्यास पोलिस आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यासोबतच जनतेनेही पोलीसाप्रमाणे पुढाकार घेतला तर अनेकांना जीवनदान मिळेल असं मत यावेळी सपोनि पांचाळ यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page