न-हापूर ते फळा पायी दिंडी सोहळा मार्गस्थ
पूर्णा-ताडकळस मार्गे फळा असा प्रवास;हजारो भाविकांचा सहभाग
पूर्णा ता.१२(प्रतिनिधी)
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील न-हापुर येथिल श्री सदगुरू सोमनाथ महाराज देवस्थान येथून श्रीक्षेत्र संत मोतीराम महाराज फळा देवस्थान कडे जाणारा पायी दिंडी सोहळा मंगळवारी (ता.१२) रोजी दिंडी प्रमुख हभप.नारायण महाराज टाकळीकर यांच्या नेतृत्वाखाली महीला अबालवृद्ध तरुण असे हजारो भाविक मार्गस्थ झाले आहेत.
पूर्णा तालुक्यातील मौजे न-हापुर येथिल श्री.सदगुरू सोमनाथ महाराज देवस्थान येथून मागिल १६ वर्षांपासून सातत्याने श्रावण महिन्यात न-हापुर ते फळा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं.याही वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन, सकाळी हभप.नारायण महाराज टाकळीकर यांनी पालखी पुजनानंतर हा सोहळा टाळ, मृदंगाच्या गजरात मार्गस्थ करण्यात आला.गौर, पुर्णा, बळीराजा कारखाना,खुजडा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले असुन,पालखी सोहळा ताडकळस येथे मुक्कामी असणार आहे.बुधवारी सकाळी फळा येथे हा पालखी सोहळा पोहचणार आहे.पुर्णा शहरात नांदेड रस्त्यावर माजी.जिल्हा प्रमुख सुधाकर खराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डिगंबराव क-हाळे,शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रमेश ठाकूर,बालाजी वैद्य, राष्ट्रवादीचे हरिभाऊ कदम मा.पं. समीती सदस्य गजानन बोगळे आदीं मान्यवरांनी पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.