राष्ट्रीय मैदानी स्पर्धा;परभणीच्या किरण म्हात्रेला रौप्यपदक
परभणी ता.२३(प्रतिनिधी):मद्रास येथे राष्ट्रीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा सुरु आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष संघाकडून सहभागी झालेला किरण म्हात्रे यांने ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्यपदक पटकावले आहे.
किरण म्हात्रे हा त्रिधारा येथील ओंकारेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी असुन,तिथेच त्याने शाळेचे क्रीडा शिक्षक रणजित काकडे यांच्याकडे अथलॅटिकचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर परभणीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रवि रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली किरणने उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळवून दिला.किरण म्हात्रे हा परभणी जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशनचा खेळाडू असून तो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून सहभागी झाला आहे.सध्या तो भारतीय सेनेत कार्यरत आहे.किरण हा परभणी तालुक्यातील त्रिधारावाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. या यशाबदल परभणी जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक डाॅ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे ,श्रीमंत कदम,प्रा.डाॅ.यु.डी.सोंळके, प्रा.डाॅ.पवन पाटील, प्रा.डाॅ.गुरुदास लोकरे,केशव शिंदे, प्रा.डाॅ.चंद्रकांत सातपुते,कल्याण पोले,प्रा.डाॅ.संतोष कोकिळ,सज्जन जैस्वाल, किशन भिसे,कैलास टेहरे,यमनाजी भाळशंकर,प्रा.डाॅ महेश जाधव, गंगाधर आव्हाड,अमोल नंद व जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.डाॅ.माधव शेजुळ आदींनी किरणचे अभिनंदन केले आहे.