खेळाडुंमध्ये हार जीत पचविण्याची क्षमता असल्यास यशोशिखर गाठता येते-प्राचार्य अच्युत जोगदंड
पुर्णेत राष्ट्रीय क्रिडा दिनी साजरा; राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झालेल्या खेळाडूंचा सन्मान
पुर्णा ता.३०(प्रतिनिधी)खेळातून सर्वांगीण विकास होतो,मनुष्य खेळातूनच पुढे जातो, खेळाडूंनी नियमित सराव केल्यास ते आपले व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करु शकतात. खेळाडुंमध्ये हार जीत पचविण्याची क्षमता असल्यास त्यांना यशोशिखर गाठता येते,असे प्रतिपादन सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य अच्युत जोगदंड यांनी केले.
पुर्णेतील क्रिडा संकुल येथे (ता.२९) शुक्रवारी परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या वतीने असो अध्यक्ष संतोष एकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्राचार्य अच्युत जोगदंड बोलत होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव स्वामी प्रमुख उपस्थितीत सहशिक्षक क्रिडा शिक्षक प्रकाश रौंदळे, क्रिडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल, सारंग सर, सुमित माने, यांची उपस्थित होत.यावेळी पुणे येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या हौशी लंगडी असोसिएशनचे खेळाडू योगेश बोबडे, शेख फैजान शेख समंदर,दशरथ पवार ,अनिकेत भोसले, मोहम्मद अफरोज, मोहम्मद इलियास,रुद्र जामगे, आरती भोसले,मंजुषा राजमाने, वैशाली शिंदे,हर्षदा पारटकर,श्रावणी जामगे,भाग्यलक्ष्मी भोसले,स्नेहल शिंदे जान्हवी भाले,गौरी भोसले, वैशाली सूर्यवंशी,आरती शिंदे,प्रणिता तांबे,नंदिनी देवणे, या १८ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.यावेळी सूत्रसंचालन वैशाली धुत, जान्हवी भाले यांनी केले. आभार लंगडी असोसिएशनचे सज्जन जयस्वाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख अय्यान शेख खादर यांनी परिश्रम घेतले.