राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी शहाजीराव देसाई यांची निवड
पूर्णा, ता.८(प्रतिनिधी);राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या वतीने तालुक्यातील रा.काॅ.चे सक्रिय कार्यकर्ते तथा पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजीराव देसाई यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी (ता.८ सप्टेंबर) रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेशदादा विटेकर यांनी त्यांना शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या.त्यानुसार शहाजीराव देसाई यांच्यावर पुर्णा तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या वेळी राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमा जिल्हाध्यक्ष तथा आ.राजेश विटेकर यांनी देसाई यांना नियुक्ती पत्र दिले आहे.यावेळी पक्षाचे आबासाहेब पवार, अंकुशराव शिंदे, गजाननराव धवन, शंकरराव नवघरे, रघुनाथ डाखोरे, श्रीधरराव पारवे, शिवाजीराव डाखोरे, गोरखनाथ साखरे, माऊली वानखेडे,पंढरीनाथ ढोणे,डी.एन. किरगे,आनंद जोगदंड,बाबुराव सोनटक्के, कुंडलिक कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शहाजीराव देसाई यांच्या निवडीनंतर पुर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा जल्लोष व्यक्त करण्यात आला असून सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.












