राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी अशोकराव बोकारें

Spread the love

जिल्हाध्यक्ष मा.आ.अँड विजयराव गव्हाणे यांनी दिले निवडीचे पत्र

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या(NCP SP) पुर्णा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.यावेळी( Parbhani Tq. पुर्णा तालुका अध्यक्षपदी येथिल पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे यांची तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. परभणी जिल्हा कार्यालयात मंगळवारी (ता.१२) ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष मा.आ.अँड.विजयराव गव्हाणे यांनी बोकारे यांना पुर्णा तालुक्यातील पक्षकार्याची जबाबदारी सोपवली आहे.यावेळी युवकचे रितेश काळे जि.प.सदस्य गजानन आंबोरे, कान्हेगाव सरपंच प्रकाशराव बोकारे, अँड.गोविंद शिंदे,तुकारामजी लोखंडे,मारोती लोखंडे, मुंजाजी जाधव,अंगद तांबे, एन.जी.शिंदे सर,शेख गणी भाई, गजानन कदम,गोविंद धवन,तुकाराम चव्हाण, यशवंतराव बोकारे, बालाजी बोकारे, तानाजी बोकारे,भानुदास बोकारे आदींनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page