नांदेड रेल्वेच्या व्यवस्थापकांकडून लिंबगाव स्थानकाची झाडाझडती
प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा;ट्रॉली, तपासणीसह उपाययोजनां बाबत समुपदेशन
पूर्णा ता.४(प्रतिनिधी)……………………………… दमरेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी ता.४ शुक्रवारी रोजी लिंबगाव स्थानकाची झाडाझडती घेतली.यावेळी त्यांनी ट्राॅली तपासणीसह स्थानकावर विविध रेल्वे यंत्रणांची तपासणी करत उपाययोजनांबाबत कर्मचाऱ्यांना समुपदेशन केले. नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक म्हणून काही महिन्यांपुर्वी पदभार स्वीकारल्यानंतर प्रदीप कामले यांनी टिकीट तपासणी मोहीम, रेल्वे रुळाची पाहाणी, विद्युतीकरणासह, प्रवाशांच्या सोई ,सुविधासह सुरक्षेबाबत कटाक्षाने पाहाणी करत आहेत.शुक्रवारी ४ रोजी नांदेड विभागातील लिंबगाव रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे यंत्रणांची तपासणी केली.प्रथमतः कामले यांनी ट्रॉली चालविणाऱ्या कर्मचार्यांच्या ज्ञानाची व ट्रॉलीच्या देखभालीसंबंधी वेळापत्रकांची चाचणी घेतली. ट्रॉली तपासणी करताना घ्यावयाच्या सुरक्षितता उपाययोजनांबाबत ट्रॉली कर्मचाऱ्यांना व पथविभाग कर्मचाऱ्यांना समुपदेशन करण्यात आले.यानंतर त्यांनी ट्रॅक मशीन (MPT) यंत्राची तपासणी करून यंत्र चालक व संबंधित कर्मचार्यांना मशीन ब्लॉक दरम्यान घ्यावयाच्या खबरदारी बाबत समुपदेशन केले.यावेळी लिंबगाव स्टेशनची देखील तपासणी केली. ज्यात लिंबगाव स्टेशन वरील कर्मचाऱ्यांना गाड्यांच्या सुरक्षित परिचालनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.या तपासणी दौऱ्यात सुजीत कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता, नांदेड आणि वशिष्ठ जोहरी, विभागीय अभियंता, नांदेड हे देखील उपस्थित होते.












