दिवाळी स्पेशल;मनमाड मार्गे २४ फे-यात धावणार पनवेल एक्स्प्रेस..!

Spread the love

दिवाळी स्पेशल;मनमाड मार्गे २४ फे-यात धावणार पनवेल एक्स्प्रेस..!
पूर्णा/प्रतिनिधी
दसरा आणि दिवाळी सणांच्या काळात रेल्वेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे एकूण २४ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ०७६२५ हुजूर साहिब नांदेड ते पनवेल २१ ऑक्टोमबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १;२५ वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोमबर आणि नोव्हेंबर, महिन्यात मिळून १२ फेऱ्या पूर्ण करेल.
तर पनवेल – नांदेड ०७६२६ हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी २२ ऑक्टोमबर ते २८नोव्हेंबर, दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी २;३० वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल , रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४;३० वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोमबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून १२ फेऱ्या पूर्ण करेल. या गाडीस वातानुकूलित आणि स्लीपर मिळून २२ डब्बे असतील.

You cannot copy content of this page