अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!
अभाविपचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!
१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व कार्तिक अमावस्या निमित्त श्री क्षेत्र त्रिधारा येथे अभाविप परभणी तर्फे भव्य आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिरात आलेल्या भाविक भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी रा. स्व. संघाचे परभणी विभाग संघचालक डॉ. रामेश्वरजी नाईक, देवगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथजी गबाळे, अवयव दान जनजागृती विषयात काम करणारे श्री. विनोद डावरे, शहर अध्यक्ष प्रा. डॉ. गिरीष कौसडीकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रावणी आवरगंड, शहर मंत्री यश घाटूळ व शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर हे उपस्थित होते.
शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पथक तसेच शहरातील नामवंत डॉक्टरांनी भाविकांची तपासणी केली. श्री. विनोद डावरे यांनी अवयवदानाचे महत्त्व तसेच याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून देखील अवयदानासंदर्भात जनजागृती केली. डॉ. श्रावणी आवरगंड यांनी अभाविप व मेडीव्हिजन या आयामाची माहिती दिली. शिबिरात एकूण 2780 लोकांची तपासणी करण्यात आली.