लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः करोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला असून राज्यात सम्पूर्ण लॉक डाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मुळ्यामंत्र्यांनी सांगितल्याने राज्यात लॉक डाऊन लागू होण्याची शक्यता आहे

या बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली

यावेळी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती मांडली रुग्ण वाढीमुळे आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले लॉक डाऊन लागू करत असताना सर्वसामान्य माणसाचा विचार करावा जेणे करून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही असेही बैठकीत मत मांडण्यात आले, राज्यात कडक लॉक डाऊन लागू न केल्यास येत्या 15 एप्रिल नंतर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, सध्या महाराष्ट्रात 35000 कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर असून महाराष्ट्रात एक हजार दोनशे मेट्रिक टन ऑक्सीजन उत्पादन सुरू आहे रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर 21 एप्रिल नंतर पुन्हा गंभीर स्थिती पाहायला भेटू शकते, लोकांना जगण्यासाठी मदत करावी व कडक निर्बंध लागू करावेत,अशा सूचना करण्यात आल्या

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुचित केल्या नुसार राज्यातील परिस्थिती हाताळली जात असून वीकेंड लॉक डाऊन चा फारसा फरक पडणार नाही असे केंद्र सरकारने सुचवल्या नंतर संपूर्ण लॉक डाऊन चा निर्णय आता घेण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले रुग्ण वाढत आहे त्यामुळे निर्णय घेण्यास शिवाय पर्याय नाही कारण तरुण आणि लहान मुले देखील बाधीत होत आहेत,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसने या भूमिकेला समर्थन दिले आहे त्यामुळे लॉक डाऊन चा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे

निर्बंध लागू करण्यापूर्वी व्यापारी आणि सर्व सामान्य माणसाचा विचार करून लॉकडाऊनचा विचार करावा,कुठल्याही ग्राहकांची वीज तोडणी करू नये,चाचण्या वाढवाव्यात ,आरोग्य सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे,असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले,

You cannot copy content of this page