हिंदू संमेलनाचे आयोजन

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील सावता माळीनगर, हनुमान मळा, दुर्गा कॉलनी, कुलस्वामिनी कॉलनी, ज्योती नगर, श्रीकृष्ण कॉलनी, या भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन शनिवार दि.१४ मार्च रोजी माळीनगर मधील स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी ४:०० वाजता होणार असून
या हिंदू संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. अमोल महाराज घोडके यांची तर समिती सदस्य म्हणून विनय राजगुरू, बालासाहेब मुंडे, देविदास खोडेवाड, सतीश वांगे, सतीश बलुतकर,श्रीकांत काळे,राजेंद्र शेप, सुरेखा काळे,ज्योती शिंदे,लक्ष्मी घुगे,अनुजा गुडे,अरुण पत्की, रोहिणी अंकुश, मनीषा रोकडे,अनिल राठोड आदींची निवड करण्यात आली आहे
हिंदू जनजागृतीसाठी आयोजित हिंदु संमेलना साठी महिला, स्वयंसेवक,कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page