गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती साठी महिला बचत गट प्रमुख यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती साठी महिला बचत गट प्रमुख यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने विधानसभा मतदारसंघ गंगाखेड 97 अंतर्गत निवडणूक आयोग निर्देशाप्रमाणे स्वीप (मतदार जनजागृती कार्यक्रम) अंतर्गत महिला बचत गट यांच्या प्रमुखांनी प्रतिज्ञा घेऊन व स्वाक्षरी मोहीम बस स्थानक, गंगाखेड येथे राबविण्यात आली
स्वीप कार्यक्रमांमध्ये 'होय! मी मतदान करणारच' या उद्घोषनेचा उच्चार करून नागरिकांनी स्वाक्षरी केली. हा कार्यक्रम शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून यशस्वी केला यामध्ये विशेषतः नवीन मतदारांनी भाग घेतला तसेच महिला बचत गट प्रमुख यांनी प्रतिज्ञा घेऊन येत्या 26 एप्रिल रोजी परभणी मतदार संघात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदान हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होण्याचा निर्धार केला.
जीवराज डापकर (सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, गंगाखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख युवराज पौळ यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जाहीर आव्हान केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयवंत सोनवणे मुख्याधिकारी, अंजना बिडगर, बाबर खान, उत्तम कांबळे, निलेश कोल्हे, दीपक भालेराव यांनी सहकार्य केले.