मा.ना.अजितदादा पवार अभिष्टचिंतन सोहळा; परळीत राष्ट्रवादीच्या वतीने सेवा संकल्प सप्ताहाचे आयोजन
विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, गुणवंतांचा गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शनपर व्याख्यान;मोठ्या संख्येने उपस्थित रहा-सोळंके,धर्माधिकारी यांचे आवाहन
परळी(वै)ता.२१(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व मा.मंत्री.आ.धनंजय मुंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित सेवा संकल्प सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन, मंगळवार(२२ जुलै)विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण,गुणवंतांचा गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके,शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर, येथे मंगळवारी सकाळी १० वाजता हा सोहळा सुरु होणार आहे.या सोहळ्यास उद्घाटक अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे(जिरंगे) तर कार्यक्रमाच्ध्यया अक्षस्थानी जि.प. गटनेते अजय मुंडे राहणार आहेत. याप्रसंगी शिक्षणतज्ञ व अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य संचालक प्रा.महेश पाटील सर यांचे शैक्षणिक मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विभाग, बीड शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ अरविंद लाटकर, दिव्यांग कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, तहसिलदार परळी वैजनाथ व्यंकटेश मुंडे, न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक त्र्यंबक कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात सेवा संकल्प सप्ताहात घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धा, मृदंग वादन स्पर्धा, महिला भजन स्पर्धा, शालेय सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव शहर व ग्रामीण, सामान्य ज्ञान स्पर्धा, रील्स स्पर्धा या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहेत. तसेच गुणवंतांचा गुणगौरव सोहळा होणार आहे.तरी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.