Parbhaniशहरात संशयास्पद स्थितीत आढळला महीलेचा मृतदेह..!

Spread the love

परभणी,ता.30(प्रतिनिधी) :

        येथील(Parbhani)अमेय नगर भागात बुधवारी (ता.30) सकाळच्या सुमारास एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. प्रत्यक्षदर्शनींनी तो प्रकार नानलपेठ पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला व ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा तो मृतदेह साखला प्लॉट भागातील गवळण निवृत्ती वाघमारे नामक महिलेचा असल्याची बाब निदर्शनास आली.
    दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने संशयास्पद स्थितीत आढळलेल्या मृत महिलेल्या त्या प्रकरणात कसून तपास सुरु केला आहे. विशेषतः श्‍वान पथक बोलावून पोलिसांनी मागोवा घ्यावयाचा प्रयत्न केला. तर ठसे तज्ञांचे पथकही पाचारण केले. दरम्यान, या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत माहिती हाती आली नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतरच त्या संबंधीच्या अहवालातून काही गोष्टी स्पष्ट होतील, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page