पूर्णेतील निर्माणधीन उड्डाणपूल खालील सर्व्हिस रोडची रुंदी वाढवा-खा.बंडू जाधव

Spread the love

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सुचना

पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल  नांदेड, हिंगोली रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या उड़ाण पुलाखालून रहदारीसाठी सोडण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी अरुंद असल्याने भविष्यात येथुन  ये-जा करणाऱ्या परिसतील बरबडी,आव्हई, सुहागन,आडगांव,पांगरा,मरसुळ पिंपळा,वाई ,हिवरा गावांतील ग्रामस्थांची कुचंबणा होणार आहे.त्यामुळे येथिल रस्त्यासाठी  प्रशासनाने  जमीन अधिग्रहण करुन २०  फुटी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा सुचना जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत  केल्या आहेत.
      परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ता.२७ रोजी खा.बंडू जाधव, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महारेल कार्पोरेशनचे कार्यकारी अभियंता राकेश शर्मा  यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांची उकल करण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी बैठकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले ,पूर्णा तालुका प्रमुख काशीनाथ काळबांडे, उपतालुका प्रमुख बालाजी वैद्य आदींनी खा.जाधव यांच्या पूर्णा येथिल उड्डाणपूल खालील अरुंद रस्त्याची रुंदी वाढवून देण्याची मागणी केली होती.यामागणीवर खा. संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी व महारेल कार्पोरेशनचे कार्यकारी अभियंता यांना सदरील सर्विस रस्त्यासाठी प्रशासनाने जमीन अधीगृहीत करुन भविष्यात उद्भवणा-या समस्येसाठी परिसरातील रस्त्याची रुंदी वाढवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

You cannot copy content of this page