Parbhaniजिल्हाधिका-यांचे “हर घर तिरंगा” अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

Spread the love

परभणी,ता.१२(प्रतिनिधी) “हर घर तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.त्यासह जिल्ह्यावासीयांनीही या अभियानातंर्गत ता .१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर, आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडूनकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम, उपक्रम हाती घेऊन हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. शासनाच्या सर्व विभागांनी/ कार्यालयांनी या अभियानात सहभाग घ्यावा. घरांव्यतिरिक्त शासकीय/निमशासकीय सहकारी/ खाजगी आस्थापना कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा.तिरंगासह सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणेही महत्वाचे आहे. सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी नागरिकांनी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000

You cannot copy content of this page