परभणीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक
जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांची माहिती
परभणी ता.२१(प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी नुकतेच नेमलेले जिल्हा प्रभारी माजी मंत्री अनिल पटेल तसेच विधानसभा प्रभारी डॉ. सरताज पठाण (जिंतूर), अँड. नुरोद्दीन चौधरी (परभणी), डॉ. दिनेश निखाते (गंगाखेड) आणि साहेबराव देवकाते (पाथरी) हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.बैठकीत जिल्हा व शहरातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद- पंचायत समिती सदस्य, इच्छुक उमेदवार, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.ही बैठक मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता परभणीतील राजीव भवन, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, शनिवार बाजार येथे होणार आहे.बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब फुलारी यांनी केले आहे.












