परभणी जिल्हा सबज्युनिअर मैदानी निवड चाचणी स्पर्धेचे पुर्णेत आयोजन
पूर्णा(प्रतिनिधी)
जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने पूर्णा येथे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील झिरोफाटा रोडवरील संत तुकाराम महाराज मंदिर समोरील मैदानावर क्रीडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांच्या वतीने ८,१०,१२,१४ वयोगटातील परभणी जिल्हा सबज्युनिअर मैदानी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या खेळाडूंची पंढरपूर येथे दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धासाठी निवड केली जाईल. याकरिता परभणी जिल्ह्याचा संघ या स्पर्धेतुन निवडला जाईल.
खेळाडुनी येताना मुळ (ओरिजनल) जन्म दाखला व आधार कार्ड घेऊन यावे प्रत्येक एका क्रीडा प्रकार साठी ५०/रू फी राहिल या स्पर्धाे मध्ये जास्तीत जास्त खेळाडुनी आपला सहभाग नोदवावा. असे अहवान जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. डॉ. माधव शेजूळ, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव रणजीत काकडे , प्रा. डाॅ. गुरुदास लोकरे व स्पर्धा आयोजक सज्जन जैस्वाल यांनी केले आहे.
👉🏿अधिक माहितीसाठी संपर्क
1)सज्जन जैस्वाल9922870570,2)सुमित माने
8446816418,3)संजय कदम9049799218
5)कैलास टेहरे9860914540,6)अब्दुल अन्सार
9970996044,7)यमनाजी भाळशंकर9730384743
टीप = ही स्पर्धा परभणी जिल्हा मधील खेळाडूसाठी आहे.