Parbhani;कौटुंबिक न्यायालयात अचानक लागली भीषण आग.!
परभणी ता.२०/प्रतिनिधी – शहरातील वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यान परिसरातील कौटुंबिक न्यायालयातील इलेक्ट्रिक रूमला अचानक लागल्याची घटना शनिवारी (ता.२०) रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शी व अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थिचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याची माहिती पुढे येत आहे .
परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यान परिसरात जिल्हा कौटुंबिक न्यायालय आहे.न्यायालयाच्या इमारतीतील इलेक्ट्रिक रूममधील मेन पॅनलला शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आग लागल्याचे दिसताच न्यायालयात उपस्थित असलेले,सुमित परिहार, अर्जुन रेंगे, करण गायकवाड, प्रज्वल गायकवाड ,वैभव गव्हाणे यांनी घटनेची माहिती परभणी,अग्निशमन दलाला दिली.अवघ्या काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दलाचेबंब क्रमांक MH-22 AN-2659 घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी डी. यू. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जवान गौरव देशमुख, दीपक कानोडे, उमेश कदम आणि वाहनचालक संतोष पोंदाळ यांच्या पथकाने जवानांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. या कारवाईत सुमित परिहार, अर्जुन रेंगे, करण गायकवाड, प्रज्वल गायकवाड यांचे धाडस लक्षणीय ठरले.आगीत इलेक्ट्रिक रूम मधील मेन पॅनल, केबल्स व मीटर जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान मा. न्यायाधीश यांना कोर्ट परिसरातून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक जवानांना यश आले, ही मोठी दिलासादायक बाब ठरली.सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र न्यायालयात अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.












