शेतकरी आत्महत्या;कर्जापायी आसोल्याच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

Spread the love

ताडकळस/प्रतिनिधी

सततची नापिकी आणी बँकेच्या कर्जाला कंटाळून असोला येथील एका शेतक-याने अगदीच टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता.७ एप्रिल रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी शेतकरी आत्महत्येप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

सुभाष पुरभाजी भरोसे (वय ३४) वर्षे रा.असोला ता.जि.परभणी असं  त्या मयत शेतक-याचे नावं आहे.आसोला शिवारात त्यांच्या नावे गट नंबर ५३९ गट नंबर एक एकर शेती असून  त्यावर त्यांनी  महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आसोला या बँकेकडून कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे?  सततची नापिकी वाढती महागाई व बँकेच्या अधिक-यांकडून कर्जाचा तगादा यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून विवंचनेत असल्याचे समजते.या तणावात त्यांनी  टोकाचं पाऊल उचलत सोमवारी पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घऱी पत्राच्याखोलील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे  पो.उप.निरीक्षक शिवकांत नागरगोजे, जमादार आप्पाराव व-हाडे आदींनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून  उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात  पाठवला आहे.घटने प्रकरणी मयताचा भाऊ रमेश पुरभाजी भरोसे यांच्या खबरी वरून ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास ताडकळस पोलिस ठाण्याचे  जमादार आप्पाराव व-हाडे  हे करीत आहेत. मयत शेतकरी सुभाष भरोसे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page