परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता होणार कॅन्सरील शस्त्रक्रिया

Spread the love

परभणी ता.१३(प्रतिनिधी)

कॅन्सर झालायं उपचारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद जाताय परभणीकरांनो थांबा आता कॅन्सर सारख्या असाह्य रोगावरील जटील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया परभणीच्याशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनात कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज मोरे यांनी करुन दाखवली आहे.त्यामुळे आता रुग्णांना कॅन्सरवर उपचारासाठी ईतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक ६० वर्षीय मजुरी करणाऱ्याला. जबड्याच्या कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनात कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज मोरे यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले.त्याच्या डाव्या बाजूच्या जबडयावर शस्त्रक्रिया केली.यासाठी त्यांनी त्याच्या छातीच्या त्वचा व स्नायू वापरून नव्याने जबड्याची निर्मिती करण्यात आली.

या प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्यतः मुंबई, पुणे अशा ठिकाणीच केल्या जातात, मात्र परभणीत ती यशस्वी झाली. यापुर्वी ७० वर्षीय रुग्णावर गुदद्व-राराच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया झाली. यात अत्याधुनिक स्टेपरल सिस्टीमचा वापर करून गुदद्वाराची जागा काढण्याची गरज टाळली.ही उपकरणे ८० हजारांची असून ती येथे निशुल्क उपलब्ध झाली. तेलंगणातील ४८ वर्षीय महिलेला १० किलो वजनाची अंडाशयातील गाठ होती. ती गर्भाशय व पोटातील आवरणासह एकसंध शस्त्रक्रियेने काढली. १६ वर्षीय मुलीच्या गुद्वार कॅन्सरवर सिग्नेट रिंग अॅडेनोकार्सिनोमाची शस्त्रक्रिया झाली. २० वर्षीय युवतीवर रॅवडोमायोसारकोमा स्तन कॅन्सरवरील शस्त्रक्रियाही झाली. ३२ वर्षीय युवकाची गुदद्व-ाराची जागा वाचवित कंटूर कर्बड कटर व स्टॅपलर वापरून शस्त्रक्रिया केली.या सर्व रुग्णांवर पूर्ण मोफत उपचार केले असून शस्त्रक्रियेअंती आवश्यक केमो-थेरपी सेवा परभणीत उपलब्ध झाली. पण रेडिएशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची गरज भासणार आहे. कॅन्सर हा जीवघेणा असला तरी वेळेत निदान व योग्य उपचारांनी तो बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे डॉ. मनोज मोरे म्हणाले.

You cannot copy content of this page