Parbhaniग्रामसेवक संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन..

Spread the love

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा केला निषेध;गुरुवारी जिल्हाकचेरीवर ‘मुकमोर्चा’

परभणी ता.५(प्रतिनिधी)
राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर(State Minister Meghana Bordikar)यांनी शनिवारी बोरी येथे एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा ग्रामसेवक संघटनेने निषेध केला असून सोमवार (ता.४) पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन गुरूवारी (ता.७) राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत एक दिवसीय (Parbhani )मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सार्वजनिक कार्यक्रमात विनायक पुंड या ग्रामपंचायत अधिकार्‍यांबाबत पालकमंत्री बोर्डीकर यांनी अवमानकारक, असभ्य आणि धमकीस्वरूपाचे वक्तव्य केले. संबंधित अधिकारी प्रामाणिकतेने आपले कर्तव्य बजावत असतांना हा प्रकार दुर्देवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकार्‍यास प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी यापूर्वी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारामुळे ग्रामपंचायत अधिकार्‍यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांच्या मनोबलावर प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राजाराम सोळंके, अशोक भोसले, ज्ञानोबा दुधाटे, विश्वनाथ कांगणे, उध्दव खूपसे, राहुल मानोलीकर, पुष्पा काळे, गणेश गिते, प्रभाकर दुधाटे, यु.आर.लाडेकर, विश्वनाथ पवार, काशिनाथ जुकटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
गुरुवारी मुकमोर्चा
गुरुवारी राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरूवारी (ता.७) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या मुकमोर्चात जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होणार आहेत.

You cannot copy content of this page