परभणीच्या उर्सास प्रारंभ;आज मानाचा संदल,मीना बाजारचे उद्घाटन

Spread the love

परभणी,(प्रतिनिधी) : १ फेब्रुवारी

शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सास शनिवार ता. १ फेबु्रवारी पासून प्रारंभ झाला असुन आज दुपारी मानाचा संदल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी निघणार असून उर्स उत्सवाचे, मीना बाजाराचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची आहे.
परभणी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या उर्सात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः कव्वालीचे दोन कार्यक्रम तर शब-ए-गझलचे दोन कार्यक्रम होणार असून या व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मीना बाजार हे उर्साचे आकर्षण राहणार आहे. या मीना बाजारात दरवर्षीप्रमाणे राज्य व राज्याबाहेरचे व्यापारी दाखल झाले आहेत. मीना बाजारामधून रेडिमेड कपडे, तागातील कपडे, पडदे, पायदाने, टेबल क्लॉथ या व्यतिरिक्त सौंदर्य प्रसाधने, क्रॉकरी, ज्वेलरी, कटलेरी, लहान मुलांची खेळणी, शोभेच्या वस्तू, संसारोपयोगी भांडी-कुंडी, ईलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या वगैरे साहित्यांचे स्टॉल्स थाटले जाणार आहेत. या व्यतिरिक्त प्रसिध्दी दिल्लीका हलवा पराठा या उपहारगृहासह दरवर्षीप्रमाणे अन्य शाकाहरी व मांसाहरी उपहारगृहे आपआपली स्टॉल्स थाटणार आहेत. मनोरंजनात्मक खेळ, खेळणी, रहाट पाळणे वगैरेही या उर्साकरीता दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page