Parbhani Heat and Runमॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघींना भरधाव कारने चिरडले
मृतात माजी जि.प.अध्यक्ष उत्तमराव कच्छवेंच्या पत्नीचा समावेश;परभणी-गंगाखेड रोडवरील माळसोन्ना शिवारातील घटना;दैठणा पोलीसांत घटनेची नोंद
परभणी ता.७(प्रतिनिधी);दररोज प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना भरधाव वेगातील कारने चिरडल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना(Parbhani-Gangakhed Malsonna Road) परभणी गंगाखेड – परभणी रस्त्यावरील माळसोन्ना गोलाई परिसरात गुरुवारी (ता.७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दैठणा येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे आपल्या पत्नी त्यांच्यासोबतच्या अंजनाबाई शिसोदे यांच्यासोबत दररोज प्रमाणे गंगाखेड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता माळसोन्ना गोलाई परिसरात पहाटे५:३० वाजेच्या सुमारास एका पांढ-या रंगाच्या भरधाव कारने पुष्पाबाई कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे या दोन महिलांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान उत्तमराव कच्छवे यांनी इतर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या यांना माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी दैठणा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये, पोलिस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोलिस अंमलदार तानाजी शिसोदे, विठ्ठल कुकडे, सोनू मोरे आदींनी तात्काळ घटनास्थळी घाव घेत मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.याप्रकरणी किशन दिगंबरराव कच्छवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध दैठणा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे दैठणा व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.












