भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

Spread the love

परभणी शहरातील उड्डाण पुलावरील घटना; अन्य तीन गंभीर जखमी

परभणी( प्रतिनिधी)

भरधाव वेगात धावणा-या दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपुलावर शनिवारी ता.३ में रोजी रात्री ८;३० वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून,अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जणं गंभीर जखमी झाले आहेत. .

स्वप्निल सत्यप्रेम लहाने वय ३१, रा. लक्ष्मी नगर, जुना पेडगाव रोड परभणी तसेच कृष्णा दिलीप जगताप पुंगळेकर वय २५, रा. क्रांतीनगर परभणी अशी या भीषण अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत.या बाबत अधिक माहिती अशी की,परभणी शहर वाहतुक शाखेतील सपोनि सत्यप्रेम लहाणे यांचा मुलगा स्वप्नील लहाणे हा शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उड्डाण पुलावरुन बसस्थानकाकडे जात होता.

याच सुमारास गंगाखेड रोडवरील क्रांती नगर येथील रहिवासी कृष्णा दिलीप जगताप हा त्याच्या घराकडे जात असतांना उड्डानपुलावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात येवढा भिषण होता की, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.तर या वाहनांवर असलेले अन्य तीघे गंभीर जखमी झाले असून,वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांसह अन्य तीघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उड्डाणपुलावर काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे अपघाताच्या घटनांवरून पहावयास मिळत आहे. दररोज किरकोळ अपघात होत असतात मात्र याठिकाणी कायम स्वरुपी वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी होत असतांनाही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. भीषण अपघातात एक मोटारसायकल क्रमांक एम.एच. 22, ए.यु. 8960 तर दुसरी मोटारसायकल ही विना नंबरची असल्याची माहिती आहे. जिल्हा रुग्णालय येथे मयत युवकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तेथील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली व दोन्ही मयत युवकांचे पार्थीव शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

You cannot copy content of this page