Parbhani jintur newsएकाच विहिरीत आढळला आईसह मुलाचा मृतदेह..!
जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारातील; परिसरात खळबळ; उलटसुलट चर्चेला उधाण
परभणी/जिंतूर (ता.१३)प्रतिनिधी एका शेत विहिरीत एका २८ वर्षीय महिला आणि तीच्या दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जिंतूर तालुक्यातील मौजे मानकेश्वर शिवारात घडल्याचे उघडकीस आले आहे.परिसरात एकच खळबळ उडाली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.घटनास्थळी जिंतूर पोलीसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
शारदा भारत पवार (वय २८) आणि मुलाचे नाव आदर्श भारत पवार (वय दीड) असे मृतांची नावे आहेत.बुधवार (ता.१३) रोजी सदर महीला व तीच्या मुलाचा मृतदेह जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारात एका विहिरीत आढळला आहे.घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक बालाजी पुंड, पोलिस अमंलदार दत्तात्रय गुंगाने, यशवंत वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान पोलिसांनी मयताची ओळख पटविली असून मृत महिलेचे नाव अशी नावे आहेत. आई व मुलगा दोनही मुळचे जिंतूर तालुक्यातील बाम्हणी येथील रहिवासी आहेत. दरम्यान आईने मुलासह विहिरीत उडी मारली का ? या मागे काय कारण आहे ? हे हत्या की आत्महत्या ? आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी जिंतूर पोलिस पुढील तपास करीत आहे.











