Parbhani; अन्यायाविरुद्ध कुरेशी समाज एकवटला जिल्हा कचेरीवर मुकमोर्चा,धरणे आंदोलन

Spread the love

परभणी ता.३१(प्रतिनिधी)

कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध समाज एकवटला असुन, समाज बांधवांनी गुरुवारी(ता.३१)रोजी आपल्या मागण्यां घेऊन जिल्हाकचेरीवर मुकमोर्चा काढण्यात आला. यानंतर (Parbhani Collector Office) जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गैरकायदेशीर व असंवैधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारा पासून, मॉबलिचिंग पासून कुरेशी सुमुदायाचे रक्षण करुन गोरक्षकांविरुध्द कायदेशीर कारवाई करुन त्यांच्यावर फौजदार खटले भरण्यात यावेत. परभणी शहरातील कुरेशी समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरीत नुतणीकरण करुन देण्यात यावेत, धार रोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करुन देण्यात यावा, तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी, कत्तलखाना येथे मांस कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्वेâट बांधून द्यावेत, परभणी जिल्ह्यातील गोशाळांचे लेखा परीक्षण करुन त्यांची तपासणी करावी, संपूर्ण कुरेशी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनावर शेकडो कुरेशी समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You cannot copy content of this page