जनावरे चोरणारी टोळी गजाआड

Spread the love

परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

परभणी ता.२०/प्रतिनिधी
जिल्हयात अनेक शेतकर्‍यांचे जनावरे चोरून फरार झालेले आरोपी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन आरोपींना मानवत पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. 2021 पासून शेतकर्‍यांची जनावरे चोरून नेत आरोपी फरार झाले होते. या आरोपींना जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे.

जिल्हयात अनेक भागात शेतकर्‍यांची जनावरे चोरून नेल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी गुन्हयातील आरोपींची व फरार झालेल्या आरोपींची माहिती घेऊन हजर करण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेला सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. मानवत पोलिस ठाणे अंतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्हयात शेतकर्‍यांची जनावरे चोरून आरोपी फरार झाले असून हे आरोपी थोरावा ता.वसमत येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली यावरून पथकाने सापळा रचून प्रसाद शेषराव देवरे वय – 27, हर्षवर्धन प्रकाश कसबे वय – 32, गोपाळ रंगनाथ देवरे वय – 39 रा.सर्व थोरावा ता.वसमत यांना थोरावा येथून ताब्यात घेतले. आरोपींनी चौकशीअंती गुन्हे केल्याच्या माहितीवरून पुढील कारवाईस्तव मानवत पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, तुपसुंदर, जयश्री आव्हाड, हानवते आणि सायबर पोलिस ठाण्याचे गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.

                               _____________

You cannot copy content of this page