स्था.गु.शाखेची पूर्णेत धाड;८४ हजारांचा गुटखा पकडला

Spread the love

शास्त्रीनगर भागतील घटना;पोलीसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांना सोबत घेऊन शहरातील शास्त्रीनगर भागातील एका गुटखा तस्कराच्या घरांवर धाड घालून सुमारे ८४ हजार रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला राजनिवास, गोवा,वझीर,मुसाफिर गुटखा जप्त केल्याची घटना मंगळवारी २७ मे रोजी पहाटेच्या घडली आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुरनं व कलम १९८/२०२५ कलम १२३,२२३,२७४, २७५ , ५३,३(५)भारतीय न्याय संहितासह कलम ५९ अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पूर्णा शहरात सोमवार मध्यरात्री पासून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पूर्णा पोलीसांना सोबत घेऊन गस्तीवर होते.पथकाने शास्त्रीनगर भागातील अब्दुल नोमान अब्दुल इलियास नामक ईसमाच्या घरी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास छापा घातला. यावेळी पोलीसांना ८४ हजार ४० रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेल्या राजनिवास, गोवा, वझीर,मुसाफिर गुटख्याची पाकिटे ४ पोत्यात भरलेले आढळून आले.सदरील इसमास घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटख्यासह पूर्णा पोलिस ठाण्यात आणुन स्थानिक गुन्हा शाखेचे पो.ना. गजानन देविदास क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून अब्दुल नोमान अब्दुल इलियास शास्त्रीनगर पूर्णा तसेच अन्य एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विवेकानंद पाटील,पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंदनसिंह परिहार,व श्रीनिवास पडलवार,पोहेकाॅ रंगनाथ दुधाटे,सचिन भदरगे,केशव लटपटे,उत्तम हानवते, हनुमान ढगे, गजानन क्षिरसागर,श्रीमती आव्हाड,सतिष पिंपळे, आदींनी केली आहे.दरम्यान गुटखा सह ताब्यात घेतलेल्या अब्दुल नुमान यास तपास अधिकारी फौजदार पडलवार यांनी मा.पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page