घरफोडया व दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;मोटार सायकलसहीत दोन आरोपी ताब्यात
परभणी/प्रतिनिधी
शहरासह जिल्हयात मोटारसायकल चोरणार्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडया व चोरी करणार्या दोन आरोपीस मोटारसायकल व मुद्देमालासहीत ताब्यात घेतले आहे.
शहरासह जिल्हयात होणार्या घरफोडया व मोटार सायकल चोरीबाबत तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते. या पथकाने शोध घेत असतांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून आरोपी कालासिंग गुरू बवनसिंग दुधानी (वय 20) राहणार साखला प्लॉट परभणी, राहुलसिंग धारासिंग दुधानी (वय 18) राहणार साखला प्लॉट परभणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दैठणा पोलिस स्टेशन अंतर्गत पोखर्णी फाटा येथील दुकानाचे शेटर उचकटून घरफोडी करत रक्कम चोरली तसेच पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत एक मोटारसायकल चोरल्याचे सांगीतले. या आरोपींकडून गुन्हयात चोरी गेलेली मोटारसायकल व मुद्द रक्कम असा एकूण 61 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना पुढील तपासकामी दैठणा पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक राजु मुतेफोड, सहाय्यक पोलिस अमलदार चट्टे, सुग्रिव केंद्रे, निलेश भुजबळ, रणजित आगळे, सुर्यकांत फड, लक्ष्मण कांंगणे, निलेश परसोडे, रफियोदीन शेख, परसराम गायकवाड, दिपक मुदीराज आणि सायबर पोलिस ठाण्याचे गणेश कौठकर यांच्या पथकाने मिळून केली.
______________