ट्रॅक्टरसह वाळु उपशाच्या दोन किनी जप्त

Spread the love

पोलीसांची पूर्णा नदीपात्रात छापेमारी;स्था.गु.शा व स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई

पूर्णा/प्रतिनिधी

नदीपात्रात ट्रॅक्टरला किनीयंत्र जोडून वाळू उपसा करत असलेल्या पूर्णा तालुक्यातील कान्हेगांव शिवारात स्था. गु.शा व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी ता.६ में रोजी सकाळच्या सुमारास संयुक्त कारवाई करत ट्रॅक्टरसह दोन किनीयंत्र असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टरचालक व किनी मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा तालुक्यातील मौजे कान्हेगांव शिवारातील नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्था.नि.गुन्हा शाखा स्थानिकांना मिळाल्याने पो.अधिक्षक. रविंद्रसिंह परदेशी,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विवेकानंद पाटील

फौजदार चंदनसिंह परिहार,पोहेकाॅ. रंगनाथ दुधाटे,पोकाॅ.सचिन भदरगे, पोकाॅ.हनुमान ढगे, शेख शारेक यांच्या सह स्थानिक पोलीस ठाण्याचे फौजदार प्रकाश इंगोले जमादार रमेश मुजमुले आदींनी मंगळवारी ६ रोजी पहाटे पासूनच परिसरात सापळा रचला होता.सकाळी ८;३० वाजण्याच्या सुमारास पोलीस किनीयंत्र सुरू असलेल्या ठिकाणी छाप मारण्यासाठी धडक मारत असताना पोलिसांच्या पथकाला पाहुन घटनास्थळावरून चालकासह चार ते पाच वाळू माफिया नदीपात्र उड्या घेऊन पसार झाले.पोलीसांनी घटनास्थळांवरून विना नंबरच्या ट्रॅक्टरसह दोन किनी यंत्र असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पूर्णा पोलीस ठाण्यात पोकाॅ. हनुमान ढगे यांच्या फिर्यादीवरून किनी मालक ट्रॅक्टर चालक मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You cannot copy content of this page