अबब..दिड कोटी हडपले;महीला सरपंच ग्रामसेवक व सरपंच पती यांचा कारनामा

Spread the love

परभणी जिल्ह्यातील वांगी-कुंभारी ग्राम पंचायतीतील प्रकार; मा.मानवत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मानवत(प्रतिनिधी)
जनतेतून निवडून आलेल्या महीला सरपंच, ग्रामसेवक व सरपंच पतीने शासनाच्या दिड कोटी रुपयांवर डल्ला मारुन शासनाला चुना लावल्याचे प्रकरण परभणी जिल्ह्यातील वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीत उघडकीस आले असून, याप्रकरणी मानवत न्यायालयानचे न्यायदंडाधिकारी जी.ए. करजकर यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथराव मुळे यांनी फिर्याद दाखल केली होती.यात वांगी-कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच निता नंदकुमार चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी व ग्रामसेवक मन्नथ साखरे यांनी संगनमत करून फेब्रुवारी २०२१ पासून ते आजतागायत शासकीय निधीतून अपहार केला आहे.वांगी-कुंभारी ग्राम पंचायतचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली असून सरपंच निता चौधरी यांच्याऐवजी नंदकुमार चौधरी हेच सह्या करतात. अनेक नियमबाह्य कामे केलीत. कागदपत्रांवर दाखवलेल्या खर्चाच्या प्रत्यक्ष चांगल्या प्रतीचे कामे केलेली नाहीत .या संदर्भात गट विकास अधिकारी,तहसिलदार, उप विभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या.या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली नाही. मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अ‍ॅड.एम.एस. कुलकर्णी,कुंभारीकर, अ‍ॅड.आर.बी.वांगीकर, अ‍ॅड. अमोल जोशी,अ‍ॅड.एम.एम.कुलकर्णी,अ‍ॅड मयुरी देशपांडे यांच्यामार्फत धाव घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणात सुनावणीत वांगी-कुंभारी ग्राम पंचायतचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या प्रकरणात वांगी-कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी.ए. करजकर यांनी दिले आहेत.

You cannot copy content of this page