सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची परभणी जिल्हा प्रशासनात एन्ट्री
राज्यशासनाचे आदेश जारी;६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर पालक सचिवांची जबाबदारी
परभणी, ता.२३ (प्रतिनिधी) – Parbhani Gardian Secretary Tukaram Mundhe;महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवपदी नियुक्ती केली असून, परभणी जिल्ह्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पालक सचिव (Guardian Secretary) हे पद राज्य सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे असते. महाराष्ट्रात प्रशासकीय कामांना गती देणे आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, या उद्देशाने ही यंत्रणा कार्यरत आहे.
पालक सचिवांच्या प्रमुख जबाबदाऱ्या
पालक सचिवांवर राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची आणि लोककल्याणकारी योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. जिल्हा स्तरावरील प्रशासकीय प्रश्न मंत्रालय स्तरावर प्रलंबित राहू नयेत यासाठी ते समन्वय साधतात.जिल्ह्यात नियमित ‘लोकशाही दिन’ आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसेच दर तीन महिन्यांतून किमान एकदा जिल्हा दौरा करून विकासकामांचा आढावा घेणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी समन्वय साधून विकासकामांना चालना देण्याची भूमिकाही ते बजावतात.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये
राजेश अगरवाल – राज्याचे मुख्य सचिव; गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी,राधिका रस्तोगी -नाशिक जिल्ह्याच्या पालक सचिव,एकनाथ डवले– नाशिकचे पालक सचिव म्हणून पूर्वी कामकाजयांचा समावेश आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यातील विकासकामे, प्रशासकीय समन्वय आणि तक्रार निवारण प्रक्रियेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्या साठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.










