प्रजासत्ताकदिनी विशेष पथकाचे पो.उप.नि.चंद्रकांत पवार सन्मानित..
प्रजासत्ताकदिनी विशेष पथकाचे पो.उप.नि.चंद्रकांत पवार सन्मानित..
परभणीचे पो.अ.जयंत मिना यांनी सन्मान पत्र देऊन केला गौरव
परभणी/प्रतिनिधी
मागील तीन महीन्यात परभणी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात नानस्टाॅप १२३ कार्यवाही करणा-या परभणी पोलीस दलातील पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील कर्तबगार पोलिस उप.निरीक्षक चंद्रकांत पंडीतराव पवार यांचा प्रजासत्ताक दिनी पो.अ.जयंत मिना यांनी सन्मान पत्र देऊन गौरव केला आहे.
नांदेड येथुन दिड ते दोन वर्षांपूर्वी परभणी पोलीस दलात बदली होऊन रुजु झालेले पो.उप.निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी पुर्णा येथे आपले कर्तृत्व सिद्ध केले होते.येथे त्यांनी निर्घुण खुन, विनयभंग, बलात्कार, सह बहुचर्चित आॅनरकिलींग प्रकरणाचा छडा लावत आरोपींना गजाआड केले होते.शहरासह परिसरात दारु,मटका,जुगार,गुटखा या अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करून सोडले होते.त्यांची मागील तीन ते चार महीन्यापुर्वी कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आली होती.जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधाचा बिमोड करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली.
पवार यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जिल्ह्यातील विशेष पथकाची जबाबदारी सोपावली.या जबाबदारी त त्यांनी व त्यांच्या संपूर्ण सहकारी पोलिस अधीक्षक मिना यांच्या विश्वासास पात्र ठरत त्यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य,वाळु चोरी, अवैध गुटखा विक्री,चंदन तस्करी, अवैध शस्त्रधा-यांवर कार्यवाही शेकडो कार्यवाही केल्या त्यासह, नुकतीच मोटारसायकल तस्कारांची मोठी ३२ मोटारसायकल सह जप्त करीत जिल्हाभरात जवळपास १२३ कार्यवाह्या केल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पो.उप.नि चंद्रकांत पवार यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलीस खात्यासह सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.