जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोना लस घेऊन लसीकरण मोहिमेला दिली चालना

Spread the love

जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोना लस घेऊन लसीकरण मोहिमेला दिली चालना
 
परभणी (जिमाका) दि. 6 :- इतर कोणत्याही आजारापेक्षा कोरोना आजाराला सर्वच धास्तावून गेलेले आहेत. अनेकांच्या मनात भिती आणि शंकाही खूप आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखणारी प्रभावी लस आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधित केली आहे. ती पुर्णत: सुरक्षित असून लसीकरण मोहिमेच्या या पहिल्या टप्प्यात मी स्वत: घेतली असून इतरांनीही या लसीकरणाची भिती मनातून दूर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले. आज 6 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात जावून कोरोनाची लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने कोविड निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश केला आहे. टप्प्याटप्याने ही लस सामान्य नागरिकांपर्यंतही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page