परभणीत आरटीओ कडून विनामास्क रिक्षाचालक वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही…

Spread the love

परभणीत आरटीओ कडून विनामास्क रिक्षाचालक वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही…
परभणी/प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनासह येथिल आरटीओनींही कंबर कसली असून सोमवार २२ रोजी विना मास्क अॅटो रिक्षा चालवणा-या ७० पेक्षा अधिक रिक्षाचालकांसह मोठ्या वाहनधारकांविरूध्द कारवाई केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे पुन्हा एकदा अँक्शनमोड मध्ये आले आहेत. त्यांनी एकापाठोपाठ एक आदेश निर्गमित करत जिल्ह्यात आठवडी बाजार,ईयत्ता १० व १२ वी वगळता सर्व शाळा बंद तसेच गर्दी होणा-या मंगलकार्यालय विरोधात धडक मोहीम, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांना मोर्चा आंदोलन, रास्तारोको, उपोषण यावर बंदी घातली आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी मुगळीकरांनी नागरिकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे, सॅनिटायझरने सातत्याने हात धुवावेत, बाजारपेठेसह दुकानांतून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये आदी सूचना त्यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर येऊ लागल्याने अखेर जिल्हाधिकार्‍यांनी नियमांचे उल्लंघण करणारांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी अधिकारी – कर्मचार्‍यांसह विनामास्क फिरणार्‍या रिक्षाचालकांसह वाहनधारकांविरूध्द थेट कारवाई सुरू केली. विनामास्क दिसणार्‍या वाहनधारकाविरध्द थेट दंडात्मक कारवाईचे सत्र अवलंबिले. दुपारी दीड वाजेपर्यंत 70 हून अधिक वाहनधारकांविरूध्द श्री.नकाते यांच्यासह त्यांच्या अधिकारी कर्मचार्‍यांसह महापालिकेच्या पथकांनी कारवाई केली.

You cannot copy content of this page