परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..

Spread the love

परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश..

परभणी/प्रतिनिधी
कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मीकस्थळे दि. 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये गर्दी पाहता काही कालावधीकरिता बंद करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकार्‍यांवर राहिल, असेही आदेशात म्हटले आहे.

You cannot copy content of this page