परभणीत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उतरले रस्त्यावर …
परभणीत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उतरले रस्त्यावर …
बाजारपेठेत प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघण करणाऱ्या विरोधात कार्यवाही..
परभणी /प्रतिनिधी
कोरोनाच्या संक्रमणकाळात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे स्वतःच रस्त्यावर उतरले आहेत.आज मंगळवार दि.२३ रोजी परभणीच्या बाजारपेठेत बेजवाबदार नागरिकांसह व्यापाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्यानंतर सुध्दा सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारीवर्गाकडून खुलेआमपणे प्रशासकीय आदेशाची पायमल्ली करीत आहेत.परभणी बाजारात सकाळपासून उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक बाजारपेठांमधुन फेरफटका मारत होते. विशेषतः या पथकाने कारवाई सुरू केल्या पाठोपाठ जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर हे स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील आरआर टॉवर, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड, वगैरे भागात पायी फेरफटका मारत जिल्हाधिकार्यांसह पथकाने काही वाहनधारकांना समज दिली. काहींना दंड ठोठावला. व्यापार्यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे सुनावले. जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या ताफ्याने व्यापारी पेठांमध्ये मोठी खळबळ उडाली. पथकाच्या धास्तीने व्यापार्यांनी वाहनधारकांनी पटापट मास्क तोंडावर चढवले. तसेच दुकानांमधून सॅनिटायझरच्या बाटल्या काऊंटवर ठेवल्या, गर्दीची ठिकाणे या कारवाई पाठोपाठ ओस पडली….












