परभणी जिल्ह्यातील आस्थापना, फळे व भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश
जिल्ह्यातील आस्थापना, फळे व भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश
परभणी, दि.5 :- जिल्ह्यात कोव्हिड- 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 कलम 144 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनेतील अधिकारी-कर्मचारी व मालक, कामगार , व्यापारी , फळ व भाजीपाला आणि दुध विक्रेते, चिकन , मटण, अंडी विक्रेते , रिक्षा , टॅक्सी चालकांना दि. 16 मार्च 2021 पर्यंत आरटीपीसीआर, अॅन्टीजन तपासणी करुन घेण्याबाबचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी शुक्रवार दि.5 मार्च 2021 रोजी जारी केले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या वाढत असून सद्यस्थितीत जिल्हयातील शासकीय, खाजगी आस्थापनेतील अधिकारी- कर्मचारी व मालक, कामगार, व्यापारी, फळ विक्रते , भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, चिकन, मटन, अंडी विक्रेते,रिक्षा, टॅक्सी चालक इत्यादीकडे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग, प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असल्याने शासकीय, खाजगी आस्थापनेतील अधिकारी- कर्मचारी व मालक, कामगारांची आरटीपीसीआर, अॅन्टीजन तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यावी. आदेशाचे उल्लंघन करुन आस्थापना उघडल्यास त्यांच्यावर महानगरपालिका आयुक्त, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच व्यापारी आस्थापनेशी संबंधित कार्यालयांनी कार्यवाही करावी. हे आदेश प्रत्येक ईसमावर तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
–––––