मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड प्रवासी वाहतुकीस 23 मार्चपर्यंत प्रतिबंध
मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड प्रवासी वाहतुकीस 23 मार्चपर्यंत प्रतिबंध
परभणी, दि.15 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प परभणी जिल्हयातुन पुणे व मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व खाजगी बस वाहतुक दि .16 ते 23 मार्च 2021 पर्यंत बंद करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसद्वारे परभणी जिल्हयातुन औरंगाबाद व नांदेड येथे जाणारी व येणारी प्रवासी वाहतुक दि .16 ते 23 मार्च 2021 पर्यंत बंद करण्यात आली आहे . सदर प्रतिबंधातून पुर्व परवानगीने अत्यावश्यक सेवेस सुट देण्यात आलेली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत.–––––












