हिंगोली दरोड्यातील मुख्य आरोपी परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाकडून जेरबंद….
हिंगोली दरोड्यातील मुख्य आरोपी परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाकडून जेरबंद….
परभणी/प्रतिनिधी
हिंगोली येथील दरोड्यातील मुख्य आरोपीस परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.16) ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन चारचाकी वाहनेही जप्त केली.
दरम्यान, दरोड्यासाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाचाही क्रमांक त्याने बदलल्याचेही तपासातून पुढे आले आहे.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीबाबत स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांना सांगितली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, पाथरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री.राऊत, कर्मचारी श्री.गिराम यांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा लावला. त्यावेळी एका चारचाकी वाहनातून तो जात असल्याचे दिसून येताच त्यास मोठ्या शिताफीने पथकाने ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहनाचा क्रमांकही त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने बदलल्याचेही तपासातून पुढ आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीस अधिक चौकशीसाठी हिंगोली पोलिसांच्या ताब्यात दिले.