भरधाव कारने पोलिसांना चिरडले…
भरधाव कारने पोलिसांना चिरडले…
एका पोलिस अधिका-याचा मृत्यू एक मपोशि गंभीर जखमी…
परभणी/प्रतिनिधी
भरधाव वेगाने जाणा-या एका कारने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार कन्हैया सरोदे यांचा मृत्यू झाला. तर पोलिस शिपाई आशा मुसळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मध्यवस्तीतील पोलिस मुख्यालयासमोर गुरूवारी सांयकाळी सव्वा पाच वाजता पेट्रोलपंपाच्या बाजुला असलेल्या रस्त्याने सरोदे हे मुख्खालयातून बाहेर येत होते. त्याच वेळी आशा मुसळे या दुचाकीने मुख्यालयाकडे जात होत्या. त्याच क्षणी एका पांढऱ्या रंगाच्या आयटेन कारने या दोघांना जोरदार धडक दिली. त्यात सरोदे यांचा डोक्यास मोठा मार लागल्याने जागीच मृत्यू झाला व मुसळे या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सुनिल ओव्हळ आदीनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस या प्रकरणात संबंधित कारसह कारचालकाचा तपास करीत आहेत.












