परभणी जिल्ह्यात एसटीसह व खासगी बससेवा 31 मार्चपर्यंत बंद….
परभणी जिल्ह्यात एसटीसह व खासगी बससेवा 31 मार्चपर्यंत बंद….
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश..
परभणी/प्रतिनिधी
आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत एसटीसह खासगी बससेवा सोमवारपासून (दि.22) ते 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि. 20) काढले.
परभणी बसस्थानकाची जागा प्रवाशांसाठी अपुरी आहे. जिल्ह्यातील इतर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद करीत संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत सर्व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमुद केले आहे.
एसटी महामंडळाची तसेच खासगी बसमधुन होणारी सर्व प्रवाशी वाहतुक सोमवारपासून (दि.22) ते 31 मार्चपर्यंत आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्यावर राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.












