परभणी जिल्हा बुधवार पासुन लाॅकडाऊन..!

Spread the love

परभणी जिल्हा बुधवार पासुन लाॅकडाऊन..!
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश;२४ ते ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी…

परभणी/प्रतीनिधी
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि.24) सायंकाळी सात वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करीत असल्याचा आदेश सोमवारी (दि.22) रात्री जारी केले.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ती साखळी तुटावी म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेशात जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page