पूर्णा,पालम, गंगाखेडकरांसाठी आ.गुठ्ठे कडुन रुग्णवाहिका…
पूर्णा,पालम, गंगाखेडकरांसाठी आ.गुठ्ठे कडुन रुग्णवाहिका… जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत लोकार्पण….
परभणी/प्रतिनिधी
ः आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या विकासनिधीमधून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेडसह पालम, पूर्णा या तीन तालुक्यांसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.दोन) झाले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णसेवा मिळावी, या उद्देशाने त्यांच्या विकासनिधीमधून रुग्णवाहिका त्यांनी मंजुर करून घेत त्या रुग्णसेवेसाठी दिल्या. त्या रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, यांच्यासह रवी कांबळे, आकाश जाधव आदींच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान, तिन्ही रुग्णवाहिकेच्या चाव्या जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.