गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…
गंगाखेडहुन पुण्याकडे जाणा-या तीन खाजगी बसेस पकडल्या…
परभणी आरटीओसह जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई..
परभणी/ प्रतिनिधी
जिल्ह्यातून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन जाणार्या तीन ट्रॅव्हल्सविरूध्द आरटीओसह महसूलच्या पथकाने गुरुवारी (दि.१) रात्री गंगाखेडात कारवाई केली. दरम्यान, महसूल प्रशासन व आरटीओने केलेल्या कारवाईने मोठी खळबळ उडाली. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणारी व परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणार्या प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध घातला आहे. कोरोनास आळा घालण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांनी उपप्रादेशीक परिवहन अधिकार्यांना अशा वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील महामंडळाच्या बसेससह खासगी बसला प्रवाशी नेण्यास व आणण्यास प्रतिबंध घातलेला असतानाही ट्रॅव्हल्सधारक पालम – गंगाखेड मार्गे पुण्याला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांना मिळाली होती. उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून होणार्या या प्रवाशी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या गुरुवारी (दि.एक) रात्री महसूल प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने वाहतुक करणार्या तीन खासगी बसेसवर कारवाई केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, वाहन निरीक्षक अभिजीत वाघमारे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, गंगाखेडचे तहसीलदार श्री.कंकाळ, पोलिस निरीक्षक वसुंधऱा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड आदींच्या पथकाने पुण्याकडे जाणार्या एमएच बीजी3098, एमएच08 ई 9992, एमएच23 डब्ल्यू 1977 या तीन खासगी बसवर कारवाई विशेष म्हणजे या त्न्हिी खासगी बसमध्ये प्रवाशीही मोठ्या प्रमाणावर होते. या बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासह जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. साथरोग प्रतिबंधात्मक नियमाअंतर्गत या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.