स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाच लाख रुपयाचा गुटखा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाच लाख रुपयाचा गुटखा जप्त
परभणी : /जाकीर पठान
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त चालु असतांना मिळालेल्या माहिती वरुन दिनांक 18 मार्च 2024 रोजी रात्री सापळा रचुन पाठलाग करुन गुटख्याची वाहतुक करणाना एका इनोव्हा गाडीस ताब्यात घेवुन झडती घेण्यात आली असता सदर इन्होव्हा गाडी मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा मिळुन आला. सदरील गुटख्याची किंमत 5 लाख 29 हजार 200 असून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कार्यवाही सत्र सुरु केले.
या छाप्या मध्ये इन्होवा गाडी मध्ये एकुण 36 पोते अढळुन आले प्रत्येकी एका पोत्यामध्ये 70 पुडे गोवा 1000, गुटखा असे लेबल असलेले पुडे प्रत्येकी एका पुड्याची किमत 210/-रु असा एकुण 5,29200/-रु मुददेमाल तसेच 500000/- रुपये किमती वाहन इन्होवा क्रमांक एमएच 04 डिएन 6197 असा आर टीओ पासींग क्रमांक असलेले चारचाकी वाहन चालक नामे नरू
वाघ रा.पोखर्णी, अफरोज पठाण
शेख रोफ शेख जियाउदीन दोन्ही रा. परळी, ज्ञानेश्वर बाराकुते रा. माळसोन्ना, सयद अब्बास रा. परभणी तसेच, वाहानाचे मालक यांचे विरूध्द पोस्टे दैठणा गुरं.न 81/2024 कलम 328, 272, 273, 188 भा.दं.वि प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. या छाप्यात चारचाकी वाहन इनोव्हा व मुददेमाल असा एकुण 10,29,200/- रु मुददेमाल हस्तगत करण्यात येवुन नमुद प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कामगिरी श्री. रविंन्द्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक, श्री यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक परभणी, श्री अशोक घोरबांड पोलीस निरिक्षक स्था.गु.शा परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुत्येपोड, पोलीस अमंलदार परसराम गायकवाड, राहुल परसोडे, दिलीप निलपत्रेवार, चालक केंन्द्रे, इम्रान, रवि जाधव ने. स्था.गु.शा बालाजी रेडडी, गणेश कोटकर, राजेश आगाशे ने. सायबर पोस्टे यांनी मिळुन पार पाडली आहे.