परभणी(Parbhani);धनगर आरक्षणासाठी २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सनपुरी येथिल घटना; ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
परभणी(Parbhani)
धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठी खिशात ठेवून परभणी तालुक्यातील सनपुरी येथिल एका २४ वर्षीय तरुणाने शनिवार ७ डिसेंबर रोजी गावाजवळच्या ओढ्यालगत असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणी तालुक्यातील सनपूरी येथील भरत गमाजी बसुले वय २४ वर्षे असं आत्महत्या(Susied)केलेल्या तरुणाचे नाव आहे.मागील काही दिवसांपासून धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहे. जिल्ह्यात यापुर्वी मराठा आरक्षण मिळत नसल्याने अनेक तरुणांनी नैराश्य भावनेतून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.भरत बसुले हा समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने नैराश्यात होता. शनिवारी त्याने गावाजवळ ओढ्या काठच्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली.या प्रकरणी ग्रामीण पोलिस(Police)ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याच्या खिशात सापडलेल्या चिट्टीमध्ये धनगर समाजाला एसटी(ST) प्रवर्गात आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ भागवत बसुले यांनी दिलेल्या खबरीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोेंद करण्यात आली आहे.